गुडबाय
"श्वेता
पोहोचली चंद्रावर आणि
चंद्र पोचला पृथ्वी
वर" सगळे खिंकाळले.
नेहा ऑर नेहू ने मला
११वी च्या पिकनिकला
फिश पॉन्ड दिला.
नेहू तेव्हा माझ्या
डोक्यात गेली होती.
सगळी ट्रिप तिने
स्पॉईल केली. मी
तर दिवसभर गप्प
गप्प होते. संध्याकाळी,
लाँच मध्ये बसायला
जेट्टी वर उभी राहिले. लॉंच लाटांबरोबर
हलत होती. नेहुने
हात पुढे केला.
पण, मी तिच्याकडे
साफ दुर्लक्ष करून
बोटमॅनच्या हाताला धरून
आत आले. मी आता आले नी "गणपती बाप्पा मोरया" च्या गजरात लॉंच
सुरु झाली.ते सगळे काय चालले होते,हे मला कळले नाही? "यू आर फुलींग विथ मी?"आय
जस्ट स्क्रीम्ड एट नेहू. झालं!नेहू आणि मी लॉन्चच्या पूर्ण प्रवासात भांडलो."नेहा
यू आर ऑबनॉकझीअस" लॉन्च मधून उतरताना मी तिच्या अंगावर ओरडून तरातरा निघाले.ट्रेन
मध्ये बसल्यावर आठवले कि घरी मावशी साठी घेतलेली फुले, गुडीज या सगळ्यांची बॅग लॉन्च
मध्येच विसरले.सोमवारी कॉलेजला जाऊच नये वाटत होते.वन्स अगेन आय विल बी अन ऑब्जेक्ट
ऑफ रिडिक्यूल.काय करावे सुचत नव्हते.दियाला कॉल केला तर म्हणाली "चिल यार मार,
तू पागल हो गयी है.नेहा को गेट लॉस्ट.तू कॉलेजला ये. अटेन्डन्स बुडला तर तुला प्रॉब्लेम
होईल."कॉलेजला आले.एव्हरीथिंग वोज नॉर्मल.माझ्याकडे कोणाचे लक्षच नव्हते.प्रत्येक
ग्रुप आपल्याच रिंग मध्ये टीपी करत होता.आय स्ट्रेट डॅश टू क्लासरूम. राहुल सरांचे
लेक्चर.हि इज सो क्युट लुकिंग.समवन टोल्ड मी कि त्यांची वाईफ ईज नो मॅच टू हिम. कॉलेजचा
दिवस अनव्हेंटफुल संपला.पण, माझा राग शांत झाला नव्हता.मला लक्षात आले कि नोबडी सपोर्ट्स
मी.ऑल राईट....मी स्वतःला डिफेन्ड करू शकते?करेन. बिग डील. त्या पिकनिक नंतर मीच ठरवले कि हा ग्रुप आपण सोडायचा.
सुरवातीला फ्रेंड्स खूपदा फोन करायच्या, आग्रह करून मॉल मध्ये शॉपिंगला, ईट आऊटला,
स्लिप ओव्हर ला घेऊन जायच्या.त्या त्या वेळी, नेहू येणार असेल तर काय?या बाबतीत खूप
कॉन्शिअस असायची. पण, नेहू कधी आली नाही ऑर या फ्रेंड्सनी आमची फाईट होईल म्हणून तिला
बोलावले नाही. एका स्लिपओव्हर ला
नेहू आली होती.आय वोज लिट्ल टेन्स्ड. नेहू एकदम नॉर्मल.माझ्या डोळ्यासमोर तिने माझी
लॉन्च मध्ये राहिलेली बॅग ठेवली"श्वेता, तू हि बॅग विसरली होतीस."मी खसकन
तिच्या हातून बॅग ओढली."नेहा, इतके काही महत्त्वाची त्यात नव्हते.बट थँक्स"
किती कोरडेपणा?नेहा मात्र शांत होती.मला बॅग जड वाटत होती.मावशीच्या घरी जाऊन उघडली
तर त्यात भरपूर चोकोलेट्स,काही गिफ्ट्स आणि एक सॉरी कार्ड.मला वाटले कि लगेच नेहुला
फोन करावा. दुसऱ्या दिवशी नेहूला फक्त "थँक्स" इतकेच म्हणाले.नेहा नेहमीप्रमाणे
फक्त हसली आणि माझ्या कमरेभोवती हाताचा विळखा घालून म्हणाली"आज पासून मी ऍरोबिक्सला
जाणार आहे.तुला जॉईन व्हायचे असेल तर मी तुला पिक करायला येईन".नेहू माझी बेस्ट
फ्रेंड बनली. कॉलेजची ५ वर्ष संपली.फेसबुक,ट्विटर वरून कोण कुठे कळतच होते.आम्ही मैत्रिणी
भेटायचो.पण, नंतर कोणाची लग्न झाली,कोण एम फील, पीएचडी ले गेले.नेहू पण लग्न होऊन युएस
ला गेली.मी आणि स्वरा राहिले.सगळे म्हणायचे"आपली क्रिकेट मधली शेवटची पेअर. आता
नॉन-स्ट्रायकर ला कोण राहणार?".स्वरा आऊट झाली.पुढच्या महिन्यात लग्न आहे.मीच
उरले नॉन-स्ट्रायकर एन्डला.११वी त असताना आपटे काकू आमच्या घरी आल्या तेव्हाचे आठवते"
काही नाही, मुली लग्नाच्या झाल्या कि आपोआप बारीक व्हायचे मनावर घेतात."कि होतात?'दम
लगाके हायशा' मुव्ही साठी भूमी पेडणेकरने १५ किलो वजन वाढवले होते.पण, नंतर तिने ३२
किलो वजन कमी केले.आम्हाला तर वजन वाढवायला काहीच करावे लागत नाही.जाड्या मुलींची दुःख
तुम्हाला काय करणार? मला माहित आहे कि जगात काय मी एकटीच जाडी आहे?पण, माझी फीलिंग्स
माझीच आहेत ना?नाऊ आय एम ३२. माझे लग्न होणार नाही.आय रिकॉन्सईलड टू रिऍलिटी.मी एकदम
फिलोसोफिकल झाले आहे. कधी कधी वाटते,लग्न इज नॉट एव्हरीथिंग ईन लाईफ.पण, कधी कधी वाटते.व्हाय
एम आय पुटींग ब्रेव्ह फेस?कारण, मला डिप्रेशन येते.आई-बाबा तर केव्हाच गेले.त्यांची
इच्छा मी पूर्ण करू शकले नाही.लग्न झाले असते तर मग तो रोमान्स,ती मजा,मग किड्स वाढवणे
मी खूप आतुर होते.आता वाटू लागल्यावर कि आपले आयुष्य एकदम लिनिअर होणार आहे. नोकरी,फेसबुक
फ्रेंड्स,ऑफिस फ्रेंड्स.माझे शनिवार-रविवार फ्रेंड्सना "काय करते आहेस?"
असे फोन्स. प्रत्येकाला काही ना काही व्याप आहेत, त्यांचे आणि माझे जग वेगळे झालाय.मी
इथून ते लास्ट ब्रेथ आयुष्य आताच जगून घेतलाय. सो! गुड बाय लाईफ....fatso
Shweta…perhaps, there is life after death – datepuru@gmail.com